अण्णा हजारेंना 'भारतरत्न'? - Marathi News 24taas.com

अण्णा हजारेंना 'भारतरत्न'?

www.24taas.com, राळेगणसिद्धी
 
सध्या तब्येत ठीक नसल्याने २०१२च्या निवडणुकांऐवजी आता २०१४च्या निवडणुकांमध्ये सरकारविरोधी प्रचार करणार असल्याचा एल्गार ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केला आहे.
 
अण्णांच्या गावी राळेगणसिद्धीमध्येही प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अण्णांच्या हस्ते ध्वजवंदनाचा सोहळा पार पडला. यावेळी अभिनेता अनुपम खेर हे सुद्धा उपस्थित होते.
 
गेल्या वर्षभरात अण्णा हजारे यांनी देशात जनजागृतीचे मोठे काम केलं आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीपेक्षा अण्णा हेच भारतरत्न पुरस्काराचे खरे मानकरी असल्याचे अनुपम खेर यांनी म्हटलं आहे.

First Published: Thursday, January 26, 2012, 23:14


comments powered by Disqus