टीम अण्णा राळेगणसिद्धीत - Marathi News 24taas.com

टीम अण्णा राळेगणसिद्धीत

झी २४ तास वेब टीम, राळेगणसिद्धी
टीम अण्णांमधील सदस्य अरविंद केजरीवाल, किरण बेदी आणि प्रशांत भूषण यांनी राळेगणसिद्धीत अण्णांची भेट घेतली. यावेळी त्यांनी गाझियाबादमध्ये झालेल्या बैठकीचा व़ृत्तांतही अण्णांना सांगितला. काल रात्रीच टीम अण्णांचे सदस्य पुण्यात दाखल झाले होते. हे सदस्य थोड्याच वेळापूर्वी राळेगणसिद्धीत दाखल झाले.
 
दरम्यान टीम अण्णांतील महत्वाचे सदस्य अरविंद केजरीवाल यांनी सरकारी सेवेत असताना तोडलेल्या बॉन्डची ९ लाखांची रक्कम भरण्याची तयारी दर्शवली आहे. मित्रांकडून उसनवारी करुन हे पैसे सरकारकडं भरणार असल्याचं अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं आहे. टीम अण्णांतील सदस्यांच्या आर्थिक व्यवहारांतील विसंगतीवरुन सध्या वाद निर्माण झाला आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर टीम अण्णांच्या सदस्य असलेल्या केजरीवाल यांनी दंडाची रक्कम भरण्याचा निर्णय घेतला आहे.

First Published: Sunday, October 30, 2011, 09:43


comments powered by Disqus