Last Updated: Monday, October 31, 2011, 07:42
झी २४ तास वेब टीम, पुणे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी शिवसेना आणि मनसे या दोघांनाही आपलं लक्ष्य करत टीकास्त्र सोडलं ते पिंपरी-चिंचवडमध्ये कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीरात बोलत होते. शिवसेनेने कल्याण-डोंबिवली सांभाळावे. जिथे सत्ता आहे तिथे काय काम करता येईल ते पाहावी अशी टीका अजितदादांनी केली. आणि मनसे म्हणजे नुसती बडबड असा टोळाही अजितदादांनी लगावला आहे. शिवसेना आणि मनसेने अजित पवारांवर टीका केली होती त्याला दिवाळीनंतर उत्तर देऊ असं अजित पवारांनी म्हटलं होतं. अजितदादांनी आता शिवसेना आणि मनेवर शरसंधान करुन दिवाळीनंतर राजकीय सूतळीबॉम्ब फोडला आहे.
First Published: Monday, October 31, 2011, 07:42