Last Updated: Saturday, February 18, 2012, 19:02
www.24taas.com, पुणे शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या करू दाखवलं या जाहिरातीची मनसे अध्य़क्ष राज ठाकरे यांनी पुन्हा खिल्ली उडवली. निवडून आल्यावर विकास कामे केलीच पाहिजे. करून दाखवलं तर काय उपकार केले का, अशा सवाल राज यांनी विचारला. शहराच्या विकासासाठी तुम्ही मोठ्या प्रमाणावर निधी घेत असताना त्यातून शहराचा विकास हा करून दाखवलाच पाहिजे असंही राज म्हणाले.
निव़डून आलेल्या नगरसेवकांना भेटण्यासाठी राज ठाकरे आज शनिवारी पुण्यामध्ये आले. त्यावेळी घेतल्या पत्रकार पऱिषदेमध्ये ते बोलत होते. पुण्यामध्ये मनसेला २९ जागांवर विजय मिळाला आहे. जिंकून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनंतर जास्त मतं मिळाल्याबद्दल राज ठाकरे यांनी पुणेकरांचे आभार मानले. केवळ वेळेचं गणित न बांधता आल्यामुळे मनसेचे उमेदवार जास्त जागांवर निवडून आणणे शक्य झाले नाही, अशी खंत राज ठाकरे यांनी या वेळी व्यक्त केली.
मनसेच्या रुपाने आता एक सक्षम पर्याय मिळाला असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी दिली. आपले नगरसेवक पुणेकरांच्या समस्या सोडवतील, असं अश्वासन राज यांनी यावेळी दिलं. वाहतुकीचा प्रश्न सार्वात आधी सोडवू असंही राज म्हणालेत. नाशिकमध्ये भाजपसोबत युती करणार का, या प्रश्नावर नाशिकमधली स्थिती पाहून निर्णय घेतला जाईल. याचवेळी राष्ट्रवादीच्या इतर पक्षातील माणसं फोडण्याच्या पद्धतीचा राज यांनी समाचार घेतला. दुसऱ्या पक्षातील माणूसे फोडून आपली ताकद वाढवणं चुकीचं असल्याचे राज म्हणाले. तसंच, राज्यात सरकार ज्यांचं आहे त्यांनी विकासासाठी महानगरपालिका मागणं चुकीचं आहे.
राज काय म्हणालेत पत्रकार परिषदेत.. पाहा व्हिडिओ
First Published: Saturday, February 18, 2012, 19:02