काँग्रेसमधला अंतर्गत वाद उफाळला - Marathi News 24taas.com

काँग्रेसमधला अंतर्गत वाद उफाळला

www.24taas.com, पुणे
 
पिंपरी-चिंचवडमध्ये काँग्रेसमधला अंतर्गत वाद उफाळून आलाय. पक्षाचे शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्यावर महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला मदत केल्याचा आरोप होत आहे.
 
निवडणुकीत राष्ट्रवादीनं एक हाती यश मिळवलं असताना काँग्रेसला १२८ पैकी केवळ १४ जागांवर विजय मिळालाय. या अपयशाला शहराध्यक्ष भोईर जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांनी केलाय. भोईर यांच्याकडून शहराध्यक्ष पदाचा राजीनामा घ्यावा, अशा मागणीचं निवेदन पक्षाचे वरीष्ठ नेते आणि मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलं आहे.
 
निवडणुक प्रचाराकरीता आलेला पक्षाचा निधीही भोईर यांनी पळवला, असा आरोप होतोय. दुसरीकडे भोईर यांनी आपल्यावरचे सर्व आरोप फेटाळले आहेत.

First Published: Thursday, February 23, 2012, 20:56


comments powered by Disqus