पुन्हा दिसणार 'महाशीर' ! - Marathi News 24taas.com

पुन्हा दिसणार 'महाशीर' !

झी २४ तास वेब टीम, पुणे
एकेकाळी पुणे जिल्ह्यातल्या इंद्रायणी नदीत आढळणारा महाशीर मासा १९८२ मध्ये नामशेष झाला. मात्र तळेगावच्या 'फ्रेन्डस् ऑफ नेचर' आणि केंद्र सरकारच्या एकत्रित प्रयत्नांनी हा मासा परत इंद्रायणीमध्ये पहायला मिळणार आहे.भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या देहु-आळंदीला येणारा प्रत्येक भाविक पूर्वी इंद्रायणी नदीतल्या महाशीर अर्थात देवमाशाचं दर्शन घेतल्याशिवाय परतत नसे. ९० च्या दशकात नदीतल्या वाढत्या प्रदूषणामुळे हा मासा इंद्रायणीतून नामशेष झाला.
 
मात्र आता पर्यावरणासाठी उपयुक्त आणि भाविकांची असलेला हा मासा आता पुन्हा इंद्रायणीत पहायला मिळणार आहे. तळेगावच्या 'फ्रेन्ड्स ऑफ नेचर' आणि 'सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्यूकेशन' या संस्थांच्या प्रयत्नातून हे शक्य झालं आहे. संशोधन करून या माशाची निर्मीती करण्यात आली आणि त्याला इंद्रायणी नदीत सोडण्यात आलं.
 
वाढत्या प्रदूषणामुळे अनेक प्राणी सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. अशा परिस्थीतीत महाशीर माशाची नष्ट झालेली प्रजाती पुन्हा पुनरूज्जीवीत करण्याचा हा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे.

First Published: Sunday, November 6, 2011, 06:33


comments powered by Disqus