सोलापूर अपघातात सहा ठार - Marathi News 24taas.com

सोलापूर अपघातात सहा ठार

झी २४ तास वेब टीम, सोलापूर
 
सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी करमाळा रस्त्यावरील जेऊर गावाजवळ टेम्पो आणि सुमोत अपघात झालाय. या अपघातात सहा जण जागीच ठार झालेत.
 
टेम्पोनं सुमोला धडक दिल्यानं हा अपघात झालाय. या अपघातात चार जण जखमी झाले असून त्यांच्यावर विजापूर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मरण
पावलेल्यांमध्ये पाच महिलांसह एका पुरूषाचा समावेश आहे. हे सर्व विजापूर रावेटी गल्लीत राहणारे असून शिर्डीला देवदर्शनासाठी जात असतांना हा अपघात झाला.

First Published: Sunday, November 6, 2011, 09:51


comments powered by Disqus