Last Updated: Wednesday, February 29, 2012, 11:00
www.24taas.com, पुणे पुण्याच्या पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांना हटवण्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिल्यानंतर दादांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त आशीष शर्मांनाही लवकरच घालवण्याचे संकेत दिलेत. त्यामुळं शर्मांचं काय होणार, या चर्चेनं जोर धरू लागला आहे.
एकेकाळी आशिया खंडातली श्रीमंत महापालिका असलेसी पिंपरी-चिंचवड महापालिका जेव्हा कर्जबाजारी होऊ लागली, तेव्हा आशिष शर्मा यांनी पालिकेची सूत्रं हातात घेतली. लंडनमधून अर्थशास्त्राचा अभ्यास करून आलेल्या शर्मांनी नगरसेवक आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना डोक्यावर बसू न देता पालिकेचा विकास करत पंतप्रधानांकडून बक्षिसही मिळवून दिलं. याच बक्षिसाचा अजित पवारांनी प्रचारासाठीही वापर करून घेतला.
अजित पवाराच्या या संकेतांनंतर आयुक्त शर्मांनी मात्र कुठलीही प्रतिक्रीया दिलेली नाही. मुळातच मुदतवाढ मिळालेल्या शर्मांसाठी हा फार मोठा धक्का नसला, तरी पवार शर्मांना कुठं पाठवणार, हा मुद्दा मात्र, चर्चेत आहे. मात्र निवडणुका होताच अजित पवारांनी आशिष शर्मांना घालवण्याचे संकेत दिल्याने अजित पवारांच्या या भूमिकेवर विरोधकानी जोरदार टीकेची झोड उडविली आहे.
First Published: Wednesday, February 29, 2012, 11:00