अण्णांचे मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र - Marathi News 24taas.com

अण्णांचे मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र

झी २४ तास वेब टीम, मुंबई
 
लवासा प्रकरणी अण्णांनी मुख्यमंत्र्यांवरच ताशेरे ओढलेत. लवासा प्रकरणी मुख्यमंत्री दुटप्पी भूमिका कसे काय घेऊ शकतात, असा खडा सवाल केला अण्णांनी. यासंदर्भात अण्णांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं आहे. त्यामध्ये लवासा नियमित कसं काय करता येऊ शकतं, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.
 
लवासावर राज्य सरकारमार्फत प्रदूषण नियंत्रण मंडळानं चार नोव्हेंबरला खटला दाखल करण्यात आला आहे. त्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी लवासावर खटला दाखल करणं हा पर्यावरणाच्या अटी पूर्ण करण्यासंदर्भातलाच एक भाग असल्याचं म्हंटलं होतं. त्यावर अण्णांनी जोरदार टीका केली आहे. दोषी असलेल्यांवर गांभीर्यपूर्वक कारवाई करणं हे मुख्यमंत्र्यांचं कर्तव्य असल्याचंही अण्णांनी परखडपणे सूनावलं आहे.
 
 

First Published: Tuesday, November 8, 2011, 14:09


comments powered by Disqus