Last Updated: Wednesday, November 9, 2011, 11:03
झी २४ तास वेब टीम, पुणे पुणे महापालिका अण्णा हजारे यांचा सत्कार करणार आहे. १२ जानेवारीला स्वामी विवेकानंद यांच्या जयंती दिवशी सर्व पुणेकरांच्या वतीनं हा नागरी सत्कार केला जाणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला महापालिकेतल्या सर्व पक्षांनी संमती दर्शवली आहे. अण्णांनी जनलोकपाल बिलाच्या माध्यमातून दिलेल्या लढ्याचा गौरव करत हा सत्कार करण्यात येणार आहे.
दरम्यान लवासाप्रकरणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे पुन्हा राज्य सरकारवर बरसलेत. लवासात बांधकाम करताना सर्व नियम धाब्यावर बसवण्यात आलेत. अशा लवासावर कारवाई करण्यात सरकार टाळाटाळ का करते असा सवाल अण्णांनी उपस्थित केला आहे. कायदा फक्त सर्वसामान्य जनतेसाठी आहे का ? सरकारला कायदा कळत नाही का असा प्रश्नही अण्णांनी उपस्थित केला आहे.
First Published: Wednesday, November 9, 2011, 11:03