बालकल्याण संकुलात रंगली नैसर्गिक रंगात होळी - Marathi News 24taas.com

बालकल्याण संकुलात रंगली नैसर्गिक रंगात होळी

www.24taas.com, कोल्हापूर
 
होळी खेळताना रासायनिक रंगाचा वाढता वापर आणि त्याचे त्वचेवर होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन कोल्हापुरातल्या ‘बालकल्याण संकुला’तल्या मुलांनी नैसर्गिक रंगांची होळी खेळली.
 
होळी हा सर्व रुसवे फुगवे आणि दु;ख विसरुन मनसोक्तपणे रंग खेळण्याचा सण आहे. लहानग्यांपासून थोरांपर्यंत सर्वजण या रंगोत्सवात उत्स्फुर्तपणे सामील होतात. परंतु होळी साजरी करताना काही वर्षांपासून रासायनिक रंगांचा अधिक वापर होऊ लागला आहे. या रंगांचा त्वचेवर होणारा दुष्परिणाम लक्षात घेऊन काही पर्यावरणप्रेमी संघटनांनी नैसर्गिक रंगाचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. कोल्हापुरातल्या निसर्गमित्र संस्थेनं टाकाऊ फुले, पाकळ्या, मेहंदीसारख्या वनस्पतींपासून रंग तयार केले आहेत.
 
नैसर्गिक रंग इथल्या बालकल्याण संकुलातील मुलांनाही करायला शिकवले आहेत. त्यामुळे या मुलांनी यावेळी इकोफ्रेंडली होळी साजरी केली. होळीचा हा आनंददायी सण रासायनिक रंगामुळं बेरंग करणाराही ठरू शकतो. त्यामुळं या लहानग्यांनी अंगिकारलेला इको फ्रेंडली होळीचा मंत्र सर्वानीच अवलंबण्याची गरज आहे.
 
 

First Published: Thursday, March 8, 2012, 08:19


comments powered by Disqus