कोअर कमिटीत सर्वधर्मीय व्यक्ती –अण्णा - Marathi News 24taas.com

कोअर कमिटीत सर्वधर्मीय व्यक्ती –अण्णा

झी २४ तास वेब टीम, राळेगणसिद्धी
टीम अण्णांच्या कोअर कमिटीत सर्वधर्मीय आणि चारित्र्यवान व्यक्तींचाच समावेश करण्यात येईल, त्या संदर्भात निरीक्षक आणि या संदर्भातील व्यक्तींकडून अशा व्यक्तींची निवड करण्यात येईल, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी स्पष्ट केले.
 
टीम अण्णातील सदस्य अरविंद केजरीवाल आणि प्रशांत भूषण यांनी आज राळेगणसिद्धी येथे जाऊन अण्णा हजारे यांची भेट घेतली. यावेळी अण्णा आणि टीम अण्णांमधील सदस्यांमध्ये कोअर कमिटीसंदर्भात चर्चा झाली. या संदर्भात पत्रकारांना अण्णांनी माहिती दिली.
 
कोअर कमिटीतील सदस्यांची निवड करताना कठोर नियमांचे पालन केले जाणार आहे. सदस्य हे सर्वधर्मीय आणि समाजातील सर्व स्तरातील व्यक्तींचा या कमिटीत समावेश करण्यात येणार आहे. सदस्याची पार्श्वभूमी यावेळी तपासण्यात येणार असल्याचेही अण्णांनी यावेळी सांगितले.
 
या महिन्यात कोअर कमिटीची आचारसंहिता तयार करण्यात येईल, त्यानुसार सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
 
लोकपाल संदर्भात पंचशील कायदा म्हणजे पाच वेगवेगळे कायदे सरकार आणण्याचा विचार करीत आहे, या संदर्भात पत्रकारांनी विचारले असता, अण्णा म्हणाले, अशा प्रकारे पाच कायदे आणणे चुकीचे आहे. आम्ही त्यांना विरोध करत नाही. परंतु, अशा प्रकारे कायदे करताना लोकांना विश्वासात घेतले पाहिजे. तसे झाले नाही तर त्या कायदा काही महत्व नाही. लोकशाही पद्धतीने कायदे करावे आणि त्याची अमंलबजावणीही करावी, असेही अण्णांनी ठामपणे सांगितले.
 
देशातील ज्या राज्यात सशक्त लोकायुक्त येत नाही, त्या संदर्भात कायदा होणार नाही, त्या राज्यात आम्ही आंदोलन झेडणार आहे, निवडणुकीच्या वेळी अशा सरकारविरोधात मतदान न करण्याचे आवाहनही टीम अण्णा करणार असल्याचा इशाराही अण्णांनी दिला.
 

First Published: Monday, November 14, 2011, 08:25


comments powered by Disqus