'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार' - Marathi News 24taas.com

'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार'

झी २४ तास वेब टीम, पिंपरी-चिंचवड
 
'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार' या थोर उपदेशातून घरोघरी पोहचलेले सदगुरू वामनराव पै यांच्या निरूपणामधून पिंपरी-चिंचवडचे भाविक नादमय झाले होते. पिंपरी-चिंचवडमधील नागरिक सध्या अनुपम भक्तीरसात न्हाऊन निघाले.
 
याला कारण आहे सदगुरू वामनराव पै यांच्या अलौकिक वाणीतून मिळत असलेले उपदेश. चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पुढाकारानं नवी सांगवीतल्या PWD मैदानावर सदगुरू वामनराव पै यांच्या प्रवचनाचं आयोजन करण्यात आलं. सदगुरूंच्या प्रवचनामुळे जीवनाकडे पाहण्याची नवी दृष्टी मिळाल्याचं भाविक सांगतात. तर पिंपरी चिंचवडकरांना आपले विचार सांगण्याची संधी मिळाल्यानं समाधान वाटत असल्याची प्रतिक्रिया सदगुरू वामनराव पै यांनी दिली.

First Published: Tuesday, November 15, 2011, 13:50


comments powered by Disqus