मुख्यमंत्र्यांसमोर दुष्काळी भागातलं भयाण वास्तव - Marathi News 24taas.com

मुख्यमंत्र्यांसमोर दुष्काळी भागातलं भयाण वास्तव

www.24taas.com, सांगली
 
सांगली जिल्ह्यात दुष्काळी भागातलं भयाण वास्तव मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्यावेळी समोर आलं आहे. एकीकडे जनता पाण्यासाठी वणवण करत असताना अधिकारी मात्र बिअर बारमध्ये मौजमजा करत असल्याचा आरोप खुद्द वनमंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री पतंगराव कदम यांनी केलाय.
 
तर अधिकाऱ्यांना कामाला लावण्यासाठी नेते काय करत आहेत, असा सवाल एकनाथ खडसेंनी केलाय, टंचाई निर्मुलन करण्यात सरकार कमी पडलं अशा आर. आर. पाटीलांनी दिलेल्या  कबुलीवरही त्यांनी टीका केली आहे. सरकार म्हणून तुम्ही कमी पडत असाल तर राजीनामे देऊन घरी बसा असा टोला खडसेंनी लगावलाय.
 

दरम्यान दुष्काळावरून काँग्रेस राष्ट्रवादीत जुंपलीय. मुख्यमंत्र्यांनी थेट शरद पवारांच्या कोर्टातच चेंडू टोलावलाय. दुष्काळी भागाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्र्यालयानं पथक पाठवावं अशी मागणी  मुख्यमंत्र्यांनी केलीय. तसंच सिंचन योजनांसाठी ७०० कोटींची मदत करण्याची मागणीही मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
 

First Published: Friday, April 6, 2012, 13:58


comments powered by Disqus