पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर अपघात - Marathi News 24taas.com

पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर अपघात

www.24taas.com, पुणे
 
पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर अपघात झालाय. मुंबईकडून पुण्याकडे जाणारा टेम्पो पलटून हा अपघात झालाय. कामशेत बोगद्याजवळ टेम्पो साईड बारला धडकून अपघात झालाय. अपघातात दोन जण जागीच ठार झाले असून आठ जण जखमी झालेत.
 
सांगलीमध्येही ऊसाचा ट्रक आणि मारुती कारमध्ये भीषण अपघात झालाय. मिरज-पंढरपूर मार्गावर घोरपडी फाट्याजवळ हा अपघात झालाय. या अपघातात शिरपूरच्या गायकवाड कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झालाय. यात ३ पुरुष, २ महिला आणि एका लहान मुलीचा समावेश आहे. ज्योतीराम गायकवाड, पत्नी शकुंतला गायकवाड, मुलगा सोमनाथ, सून संगीता आणि नात सायली गायकवाड आणि दुसरा मुलहा पांडुरंग गायकवाड यांचा दुर्देवी मृत्यू झालाय.
 
याशिवाय मुंबई हायवेजवळ चारोटी नाका इथं भीषण अपघात झालाय. एका कंटनेनरनं टाटासुमो आणि रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात एक जण ठार तर चार जण गंभीर जखमी झालेत. हे सर्व महालक्ष्मी यात्रेसाठी निघाले होते. यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना उपचारासाठी विरारच्या संजीवनी रूग्णालयात दाखल करण्यात आलंय.

First Published: Saturday, April 7, 2012, 15:31


comments powered by Disqus