Last Updated: Sunday, November 20, 2011, 12:36
झी २४ तास वेब टीम, लोणावळा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा मेणाचा पुतळा तयार करण्यात आलाय. हा बैठी पुतळा सुनील कंदुलर यांनी बनवलाय. हा पुतळा लोणावळ्याच्या वॅक्स म्युझियममध्ये ठेवण्यात येणार आहे. या मेणाच्या पुतळ्याचं अनावरण खुद्द अण्णा हजारे यांच्या हस्ते करण्यात आलं.
हुबेहुब अण्णांसारखाच दिसणारा हा पुतळा पाहण्यासाठी अण्णांच्या समर्थकांनी गर्दी केली होती.हा मेणाचा पुतळा पाहताना अण्णांना खूप आनंद झाला होता. हा आनंद त्यांच्या चेहऱयावर दिसत होता.यावेळी खरा कोणता आहे असा प्रश्न अण्णांनी विचारला.
First Published: Sunday, November 20, 2011, 12:36