प्रेमाला विरोध, गोळी घालून आत्महत्या - Marathi News 24taas.com

प्रेमाला विरोध, गोळी घालून आत्महत्या

www.24taas.com, पिंपरी-चिंचवड
 
पिपंरी-चिंचवडमध्ये एका १७ वर्षीय तरूणानं आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या तरूणानं स्वत:वर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. भावाच्या बंदूकीतून त्यानं ही गोळी झाडून घेतली.
 
प्रेमप्रकरणातून त्यानं हे कृत्य केल्याचं सांगण्यात येत आहे. जखमी तरूणावर आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पिंपरीच्या चिखली परिसरात जाधववाडीत हा प्रकार घडला. घरच्यांनी प्रेमप्रकऱणाला विरोध केल्यानं त्यानं हे पाऊल उचलल्याची शक्यता आहे. त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
 
जाधववाडीत राहणाऱ्या मनोजचं एका मुलीबरोबर दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मनोज सध्या बारावीमध्ये शिकतोय.प्रेमप्रकरणाला घरच्यांचा विरोध असल्यानं त्यानं आत्महत्येचा प्रयत्न केला. याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
 
 
 

First Published: Saturday, April 21, 2012, 22:54


comments powered by Disqus