पत्नी, मुलीला ठार करून प्राध्यापकाची आत्महत्या

Last Updated: Tuesday, July 3, 2012, 11:03

संजय उंबरकर या प्राध्यापकाने कौटुंबिक वादातून पत्नी , मुलीवर निर्घृण चाकूहल्ला केला. ही घटना ठाण्यातील ढोकाळी परिसरातील वर्धमान सोसायटीत घडली. या हल्ल्यात पत्नी आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला असून , मुलगा घरातून निसटल्याने तो वाचला. हल्ल्यानंतर पतीनेही आत्महत्येचा प्रयत्न केला असून , त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

आयपीएलमुळे केली आत्महत्या...

Last Updated: Wednesday, May 2, 2012, 19:48

आयपीएलवर होत असलेल्या सट्टेबाजीतून खासगी सावकारी सुरु झाली आहे. सट्टा लावण्यासाठी घेतलेल्या कर्जासाठी सावकाराकडून तगादा येऊ लागल्यानं कोल्हापुरात रेल्वेखाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

प्रेमाला विरोध, गोळी घालून आत्महत्या

Last Updated: Saturday, April 21, 2012, 22:54

पिपंरी-चिंचवडमध्ये एका १७ वर्षीय तरूणानं आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या तरूणानं स्वत:वर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. भावाच्या बंदूकीतून त्यानं ही गोळी झाडून घेतली.

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षामुळे युवकाची आत्महत्या

Last Updated: Friday, April 20, 2012, 12:40

मुंबईच्या कांदिवलीमध्ये एका युवकाने आत्महत्या केली आहे. दोन गटातल्या भांडणावरून त्याने ही आत्महत्या केल्याचं सांगितलं जातं आहे. युवकाजवळ एक सुसाईड नोटही मिळाली आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश सुर्वे तसंच पोलीस इन्स्पेक्टर प्रवीण पाटील यांचीही नावे आहेत.