दुष्काळ आबांच्या सांगलीला, पोलिसांचा पगार टांगणीला! - Marathi News 24taas.com

दुष्काळ आबांच्या सांगलीला, पोलिसांचा पगार टांगणीला!

www.24taas.com,सांगली
सांगली जिल्ह्यातल्या दुष्काळी भागाला मदत म्हणून पोलीस एक दिवसाचा पगार देणार आहेत. उद्योजक, व्यापा-यांनीही मदत करावी असं आवाहन राज्याचे गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी केलं आहे. मात्र, आर. आर. आबांची संकल्पना चांगली आहे. परंतु, राज्यातील किती मंत्री, किती आमदार आणि किती खासदार दुष्काळ ग्रस्तांना मदत करणार याची आकडेवारी आबांनी जाहीर केली नाही.
 
 
राज्यात कोट्यवधी रुपयांचे नवनवीन घोटाळे समोर येत आहेत. त्यात बडे नेत्यांचे नाव समोर येत आहेत. अशा राज्यात दुष्काळासाठी पोलिसांच्या एक दिवसाचा पगार घेणे तसे पोलिसांवर अन्याय करण्यासारखे आहे. आबांच्या अख्यारितील हे खाते असल्याने आबांनी सांगितले. म्हणून बिचाऱ्या पोलिसांना एक दिवसाचा पगार देणे भाग आहे. परंतु, आबा अशीच सक्ती आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांवर किंवा राज्यातील आमदारांवर करतील का? हा खरा प्रश्न आहे.
 
 
राज्यातील आमदारांना पगार आणि भत्ते मिळून दरमहा ७५ हजार रुपये पगार मिळतो. त्यांच्या एका दिवसाचा पगार २५०० रुपये आहे. राज्यातील २८८ आमदारांकडून ५ लाख ७० हजार रुपये जमा होतील. तर खासदारांना दरमहा १.५ लाख रुपये पगार मिळतो. त्यांचा एका दिवसाचा पगार ५००० रुपये आहे. राज्यातील ४८ खासदारांकडून २ लाख ४० हजार रुपये जमा होतील. आमदार-खासदार आणि मंत्र्यांनी फूल ना फुलाची पाकळी म्हणून एका दिवसाचा पगार देणे गरजचे आहे.
 
 
नेते मंडळी आपल्या संस्थांसाठी राज्य सरकारकडून ज्या प्रमाणात निधी उपलब्ध करून घेतात, तशा प्रकारे त्यांनी दुष्काळग्रस्तांसाठी निधी उपल्बध करून द्यावा हीच आबांकडून अपेक्षा आहे. विशेष म्हणजे आबांनी आपल्या जिल्ह्यासाठी आपल्या खात्याचा वापर केल्याचेही दिसून आले आहे.
 
 
दरम्यान, तंटामुक्त अभियानात बक्षिस मिळालेल्या गावांनी सलग तीन वर्ष चांगलं काम केलं तर,त्या गावांना बक्षिस आणि सन्मान योजना सुरु केली जाणार आहे. गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी याबाबतची घोषणा केली.

First Published: Sunday, April 22, 2012, 15:02


comments powered by Disqus