महापौरांची हाक उद्या 'पुणे बंद'... - Marathi News 24taas.com

महापौरांची हाक उद्या 'पुणे बंद'...

झी २४ तास वेब टीम, पुणे
 
शरद पवार यांच्यावर झालेला हल्ला त्यामुळे संपूर्ण राज्यात याचे पडसाद उमटले, यात अनेक ठिकाणी बंदची हाक देण्यात आली. आणि त्यामुळे या बंदला काही ठिकाणी हिंसक वळण देखील लागलं, यामुळेच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या पुण्यात देखील आज बंदची हाक दिली गेली. पण हा बंद आता खुद्द पुण्याचे महापौरच मोहनसिंग राजपाल हे घडवून आणत आहे. त्यामुळे या घटनेचा निषेध म्हणून पुण्यात उद्यादेखील बंद पाळण्यात येणार आहे
 
पुण्यात शरद पवारांच्या हल्ल्याचे हिंसक पडसाद उमटले. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरले होते. त्यांनी पुणे बंदची हाक दिली. शिमला ऑफिस चौकात कार्यकर्त्यांनी गाड्यांची जाळपोळ केली. तसचं एसटी बसेसवर दगडफेकही करण्यात आली.
 
जंगली महाराज रस्त्यावरही वाहनांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली. आमदार अनिल भोसले आणि नगरसेवकांनी शिमला ऑफिस चौकात रास्तारोको केला. नळ स्टॉप चौकातही रास्तारोको करण्यात आला. अनेक ठिकाणी या हल्ल्याविरोधात संताप व्यक्त करण्यासाठी रास्ता रोको करण्यात आला.

First Published: Thursday, November 24, 2011, 18:19


comments powered by Disqus