राळेगणमध्ये राडा - Marathi News 24taas.com

राळेगणमध्ये राडा


झी २४ तास वेब टीम, राळेगण सिद्धी
अण्णांच्या वक्तव्यावरून राळेगणमध्ये आज राडा झाला.  राळेगणमध्ये अण्णा समर्थक आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडले. राष्ट्रवादीच्या आंदोलनाने गावकरी चिडले आणि गावात घुसणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पिटाळून लावलं. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांविरोधात गावातील महिलाही आक्रमक झाल्या होत्या.
 शरद पवार यांना एका युवकाने गुरूवारी गालावर मारल्यानंतर अण्णांची प्रतिक्रिया विचारण्यात आली तेव्हा, अण्णा हजारे म्हणाले होते, एक ही थप्पड मारा?
या वक्तव्यानंतर अण्णांनी आपल्या वक्तव्याचा माध्यमांनी विपर्यास केल्याचं म्हटलं होतं. अण्णांच्या या वक्तव्याचा निषेध म्हणून पारनेर तालुक्याच्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी राळेगणसिद्धीत आत्मक्लेश आंदोलन सुरू केलंय.
अण्णांचे सहकारी सुरेश पठारे यांनी आज राळेगणसिद्दीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निषेध करावा, पण योग्य त्या मार्गाने असं म्हटलंय. राष्ट्रवादी आणि अण्णांच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दीक चकमक सुरू आहे.
 

First Published: Friday, November 25, 2011, 16:26


comments powered by Disqus