बाळासाहेब आणि राज ठाकरे गद्दार- काटजू - Marathi News 24taas.com

बाळासाहेब आणि राज ठाकरे गद्दार- काटजू

www.24taas.com, पुणे
 
प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी बाळासाहेब आणि राज ठाकरेंना लक्ष केलंय. उत्तर भारतीयांना विरोध करणारे बाळासाहेब आणि राज ठाकरे देशद्रोही असल्याची टीका त्यांनी केली. प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या बैठकीसाठी काटजू पुण्यात आले आहेत.
भूमिपुत्र  ही थेअरीच मुळात देश विरोधी आहे. मोजके आदिवासी वगळता, भारतात कोणीच भूमिपुत्र नाही. म्हणून उत्तर भारतीयांच्या विरोधात भूमिका घेणारे हे देखील मुळचे महाराष्ट्रातील नाहीत. त्यामुळे ठाकरेंनी महाराष्ट्र सोडून जावे.  असे काटजू यांनी म्हटले आहे. परप्रांतीयांच्या विरोधात भूमिका घेणारे बाळासाहेब आणि राज ठाकरे गद्दार आहेत. त्यांना देशद्रोही घोषित करूनत्यांच्यावर सरकारने कडक कारवाई केली पाहिजे अशी मागणी काटजू यांनी केली आहे.
गेल्यावेळी एका वृत्तपत्राच्या कार्यालयावर शिवसेनेने हल्ला केला होता, तेव्हाही काटजूंनी शिवसेनेवर टीका केली होती. भारतीय राज्यघटनेच्या कलम १९(१)(अ) ने प्रसारमाध्यमांना स्वातंत्र्य दिले आहे. कायद्याच्या १३व्या सेक्शननुसार वृत्तपत्रस्वातंत्र्याचे रक्षण करणे हे प्रेस कौन्सिलचे कर्तव्य आहे. पत्रकार वा प्रसारमाध्यमांवरील हल्ले हे प्रसारमाध्यमांच्या घटनात्मक हक्कांचे उल्लंघन आहे, असं म्हणत न्या. काटजूंनी शिवसेनेवर टीका केली होती.
 
वृत्तपत्र कार्यालयावर हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे. विशेषत: त्यांना अटक करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही काटजूंनी केली होती.
 
 

First Published: Friday, April 27, 2012, 20:43


comments powered by Disqus