हुक्का पार्लर, आणि बारवर छापा, ४९ अटकेत - Marathi News 24taas.com

हुक्का पार्लर, आणि बारवर छापा, ४९ अटकेत

www.24taas.com, पुणे
 
पुणे पोलिसांनी काल रात्री इन्विटेशन हॉटेलवर छापा मारून ३९ लोकांना ताब्यात घेतलं आहे. या हॉटेलमध्ये हुक्का पार्लर चालवण्यात येत होता अशी खबर पोलिसांना मिळाल्यावर तेथे धाड टाकण्य़ात आली.
 
ताब्यात घेतलेल्यांमध्ये ७ तरूणी, १५ तरूण आणि हुक्का पार्लरच्या १७ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पकडण्यात आलेली मुलं ही कॉलेजमध्ये जाणारी असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
 
त्यांना आज कोर्टात हजर केलं जाणारं आहे. तर ठाण्यातल्या आंबेडकर रोडवरही ताल बारवर छापा मारत पोलिसांनी १० बारबालांना ताब्यात घेतलं. याशिवाय २ व्यवस्थापकांनाही अटक करण्यात आली आहे.
 
 
 
 
 
 

First Published: Saturday, April 28, 2012, 17:01


comments powered by Disqus