Last Updated: Sunday, May 6, 2012, 19:46
www.24taas.com, पुणे 
पुण्यातल्या एका महिलेच्या पोटातून चक्क १७ पेनसह २२ वस्तू सापडल्या आहेत. हो खरं वाटतं नाही ना.. मात्र ही खरी घटना आहे. पुण्यातील ससून रूग्णालयातील ही घटना आहे.
मनोरूग्ण असणाऱ्या एका महिलेच्या पोटातून या वस्तू काढण्यात आल्या आहेत. सदर महिला मनोरुग्ण आहे. तिच्या पोटावर ऑपरेशन करुन १७ पेन, रिफील, लोखंडाचा रॉड आणि कंगवा सापडला आहे.
पोटदुखीच्या तक्रारीवरुन या महिलेला पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तिच्या पोटाचा एक्स रे काढल्यावर डॉक्टरांना तिच्या पोटात दोन वस्तू आढळल्या होत्या. मात्र प्रत्यक्ष ऑपरेशन केल्यावर पोटात तब्बल २२ वस्तू आढळल्या आहेत. ऑपरेशन यशस्वी झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
First Published: Sunday, May 6, 2012, 19:46