Last Updated: Monday, May 7, 2012, 09:55
www.24taas.com, सांगली 
ज्यावर दुष्काळासारखी नैसर्गिक आपत्ती आली असताना साऱ्यांनी हातात हात घालून सामोर जाणं गरजेचं असतं. मात्र दुष्काळाच्या गंभीर प्रश्नावर विरोधक राजकारण करत असल्याची टीका गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी केली आहे.
सांगलीतल्या भिलवडी इथं आयोजित एका मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी दुष्काळी भागाला पाणी मिळत नाही अशी ओरड मुंबईतले नेते इथं येऊन करतात. मात्र मुंबईकरांना पिण्याच्या पाण्यासाठी मोर्चे काढावे लागतात अशा शब्दांत गृहमंत्र्यांनी शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांना टार्गेट केलं.
शिवाय सिंचन अनुषेषाबाबत नितीन गडकरी आणि विनोद तावडेंची भूमिका दुटप्पीपणाची असल्याचं गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे. शिवाय एक स्थिर भूमिका घेण्याचा सल्ला गृहमंत्र्यांनी भाजपच्या या दोन नेत्यांना दिला आहे.
First Published: Monday, May 7, 2012, 09:55