महाराष्ट्रासाठी कोणीही एकत्र येत नाही- पवार - Marathi News 24taas.com

महाराष्ट्रासाठी कोणीही एकत्र येत नाही- पवार

www.24taas.com, सातारा
 
दुष्काळाच्या मुद्यावर सर्व पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं मत कृषीमंत्री शरद पवारांनी व्यक्त केलं आहे. शरद पवारांनी सर्वपक्षीय नेत्यांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे.
 
'दुष्काळाच्या मुद्यावर सर्वांनी एकत्र यावे' आंब्याचा प्रश्न आला की, कोकणातील आमदार आवाज उठवतात, कापूसाचा प्रश्न आला की, विदर्भातील नेतेच आवाज उठवतात. अशाने प्रांतिक वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रांतवाद निर्माण झाल्याने महाराष्ट्रात फूट पडण्याची शक्यता आहे. असे मत पवारांनी व्यक्त केले आहे.
 
तसचं 'मुखर्जींशी चर्चा करून  दुष्काळग्रस्तांसाठी पॅकेज जाहीर करणार' असल्याचेही शरद पवारांनी सांगितले.  त्याचप्रमाणे 'पहिल्या टप्प्याचा निधी लगेचच मिळणार असल्याचेही आश्वासन दिले आहे.' शिक्षणमहर्षी कर्मवीर भाउराव पाटील यांची आज  ५३ वी पुण्यतिथी त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला कृषीमंत्री शरद पवार बोलत होते.
 
 
 

First Published: Wednesday, May 9, 2012, 11:49


comments powered by Disqus