Last Updated: Wednesday, May 9, 2012, 16:24
www.24taas.com, अहमदनगर 
अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातल्या कोल्हार भगवतीपूरमध्ये लागलेल्या आगीत लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. या आगीत ६ दुकानं भक्षस्थानी पडली असून कुठलीही जीवित हानी मात्र झालेली नाही.
रात्री दहा वाजेच्या सुमारास ही आग लागली. शॉर्टसर्किटमुळं आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात येतो आहे. या आगीत गावातले कुशन, प्रिटिंग प्रेस आणि एका जनरल स्टोअर्सचं मोठं नुकासान झालं आहे.
अग्निशमन दलाच्या गाड्या येण्यापूर्वी गावकऱ्यांनीही मिळेल त्या साधनाने आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आग इतकी भयंकर होती की, त्यामुळे लाखो रूपयाचं नुकसान झालं आहे.
First Published: Wednesday, May 9, 2012, 16:24