‘क्रिकेटरत्ना’ला भारतरत्न देण्यावर आक्षेप; याचिका दाखल

Last Updated: Tuesday, November 19, 2013, 20:37

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला भारतरत्न पुरस्कार देऊ नये, अशी मागणी करणारी याचिका अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात दाखल झालीय.

शिक्षक-शिक्षिकांनाही `लुंगी डान्स`चा मोह आवरेना!

Last Updated: Saturday, September 28, 2013, 16:32

नेहमी शिक्षकांचा धाक, शिक्षकांची शिस्त असल्या गोष्टींची चर्चा होते. मात्र, अहमदनगरच्या शिक्षकांनी या सर्व आदर्शांना तिलांजली देत थेट रस्त्यात लुंगी डान्स करण्याचा पराक्रम केला

घोटभर पाण्यासाठी सख्या भावालाच फेकले विहिरीत

Last Updated: Sunday, March 17, 2013, 13:45

विहिरीतून पाणी घेण्याच्या वादावरून सख्या भावाला विहिरीत फेकून हत्या केल्याची खळबळजनक घटना अहमदनगरमध्ये घडलीये. पाराजी पुंड यानं आपल्या दोन मुलांच्या आणि सुनेच्या मदतीने सख्या भावाचा खून केलाय.

दगडफेक झालीच, राज ठाकरेंचा पोलिसांवर आरोप

Last Updated: Wednesday, February 27, 2013, 18:30

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची अहमदनगर येथील बैठक काही वेळेपूर्वीच संपली. त्यानंतर राज ठाकरे काय आदेश देणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते.

राज ठाकरेंची बैठक सुरू, काय आदेश देणार?

Last Updated: Wednesday, February 27, 2013, 17:10

अहमदनगरमध्ये राज ठाकरे मंदिरात दर्शनासाठी गेले असता, त्यांच्या ताफ्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे.

अहमदनगरमध्ये तिघांचा खून, दोन जण ताब्यात

Last Updated: Thursday, January 3, 2013, 16:36

अहमदनगर जिल्ह्यातल्या नेवासा तालुक्यात सोनाई येथे तिहेरी हत्याकांडामुळे खळबळ माजली आहे. एकाच वेळी तीन जणांचा खून झाल्याचे निदर्शनास आले आहे.

अहमदनगरमध्ये पाणी पेटले, आमदारांचे आत्मदहन?

Last Updated: Tuesday, November 27, 2012, 15:37

अहमदनगरमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय. पाण्याच्या प्रश्नावर भाजप आमदार राम शिंदे यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करुन राम शिंदे यांना ताब्यात घेतलं यावेळी पोलीस आणि शिंदे यांच्यात जोरदार धक्काबुक्की झाली.पाणीप्रश्न चांगलाच पेटलाय. शेतक-यांनी मुळा प्रकल्पाच्या दोन्ही कालव्यांचे दरवाजे उघडून पाणी सोडलयं.

बोगस कंपन्यांनपासून सावधान सावधान...

Last Updated: Wednesday, May 23, 2012, 23:35

15 हजार रुपये भरा, कंपनीचे सभासद व्हा आणि 2 वर्षांनंतर आजीवन दरमहा ५ हजार रुपये पेन्शन मिळवा’ अशी फसवी योजना जाहीर करून नगरकरांना 15 कोटींचा गंडा घालणारी बदमाश कंपनी अखेर पर्दाफाश झाला.

आगीत लाखो रूपयाची मालमत्ता भस्मसात

Last Updated: Wednesday, May 9, 2012, 16:24

अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातल्या कोल्हार भगवतीपूरमध्ये लागलेल्या आगीत लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. या आगीत ६ दुकानं भक्षस्थानी पडली असून कुठलीही जीवित हानी मात्र झालेली नाही.

देवाशी लग्न नको ग बाई...

Last Updated: Tuesday, May 8, 2012, 11:24

वय वर्षे १७. नाव सोनाली औंधकर. सोनाली नाशिककर तमाशा फडातील प्रमुख नृत्यांगना. फडाचा कणा असलेली सोनाली गेल्या वर्षी पोटदुखीने त्रस्त झाली. अनेक उपचार होऊनही गुण न आल्याने तिला ‘बाहेरची बाधा’ झाल्याचे सर्वाना वाटले. बरं होण्यासाठई तिच्या आत्याने जेजुरीच्या खंडोबाला नवस केला, ‘की सोनालीची पोटदुखी बरी झाली, तर तिचे तुझ्याशी लगीन लावेन.’ आणि तिचा प्रवास सुरू झाला तो असा...

नगरमध्ये बिबट्या मादी जेरबंद

Last Updated: Saturday, March 10, 2012, 19:37

संगमनेर तालुक्यातल्या रायतेवाडी शिवारात वनविभागाने लावलेल्या पिंज-यात बिबट्या मादी जेरबंद झाली. या मादीला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने तिच्याच बछड्यांचा उपयोग केला आणि बछड्यांच्या ममत्वापोटी ती मादी अलगद पिंज-यात अडकली गेली. मात्र, असं असलं तरी मातेपासून दुरावलेल्या या बछड्यांना पुन्हा मायेची उब मिळाल्यानं ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.