Last Updated: Friday, May 11, 2012, 16:27
www.24taas.com, पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवडमध्ये मृत्यूशी झुंज देणा-या हत्तीणीला उपचारासाठी जुन्नरच्या वन्यजीव निवारा केंद्रात पाठवण्यात आले आहे. मात्र खेदाची बाब म्हणजे मरणाच्या दारात असलेल्या हत्तीणीची प्रशासनाला माहितीही नव्हती. मात्र काही प्राणीप्रेमी तिची सेवा सुश्रुषा करत होते.
निगडी परिसरातल्या एका नाल्यात पडलेल्या या चंचल नावाच्या हत्तीणीवर तिचा मालक कित्येक दिवस उपजीविका करत होता. मात्र तिला अपघात झाल्यानंतर त्या कृतघ्न मालकानं तिला जखमी अवस्थेत सोडून दिलं. कित्येक दिवस ही हत्तीण एका नाल्यात जखमी अवस्थेत पडून होती. याची माहिती मिळाल्यानंतर प्राणी प्रेमींनी तिची सेवा सुरू केली.
चंचलवर उपचार करायला उशीर का झाला असं विचारलं असता, त्याची माहितीच नव्हती असं बेजबाबदार उत्तर इथल्या अधिका-यांनी दिलं. आता या हत्तीनीवर अत्याधुनिक पद्धतीनं उपचार केले जाणारेत. ही चंचल वाचावी अशीच तमाम प्राणी प्रेमींची इच्छा आहे..
First Published: Friday, May 11, 2012, 16:27