शिर्डीहून येताना भाविकांचा अपघात, ५ ठार - Marathi News 24taas.com

शिर्डीहून येताना भाविकांचा अपघात, ५ ठार

www.24taas.com, अहमदनगर
 
अहमदनगर जिल्ह्यातल्या मनमाड रोडवर राहुरीजवळ टाटा मॅजिकला झालेल्या अपघातात ड्रायव्हरसह ५ जणांचा मृत्यू झाला आहे. मरण पावलेले पाचही जण भाविक शिर्डीहून शनी शिंगणापूरला निघाले होते.
 
राहुरी शहरातल्या चौकात टाटा मॅजिक गाडीसमोर एक मोटरसायकलस्वार आडवा आल्यानं त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात टाटा मॅजिक गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या दुभाजकावर धडकली. त्यानंतर ही गाडी स्ट्रीट लाईटच्या पोलवर आदळली.
 
मरण पावलेले चार भाविक मुंबईच्या परळ भागातील रहिवासी आहेत. मृतांमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. मधु अग्रवाल, सुरेश अग्रवाल, विद्या तनवडे, मोहन बोर्डे, आणि चालक सोनावणे अशी मृतांची नावं आहेत.
 
 
 
 

First Published: Sunday, May 13, 2012, 08:57


comments powered by Disqus