Last Updated: Thursday, September 26, 2013, 07:38
www.24taas.com, झी २४ तास, पुणेकाँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांनी राष्ट्रवादीला महाराष्ट्रात शून्य करण्यासाठी कंबर कसली असून आज पुण्यात त्यांनी कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीला नामशेष करण्याचा फॉर्म्युला दिला.
राहुल गांधी सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून त्यांनी आज पुण्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची एक खास बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी कानमंत्र दिला आहे. आपल्याला असे काही काम करायचे की आपल्याला भविष्यात राष्ट्रवादी काय कोणाचीच गरज पडता कामा नये, असे राहुल गांधी यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना सांगितले.
या बैठकीत युवराज राहुल गांधी एका शिक्षकाची भूमिकेत होते. त्यांनी कार्यकर्त्यांची पाठशाला घेतली. ते म्हणाले, महाराष्ट्रात कोणत्या पदाधिकाऱ्याची भूमिका योग्य रित्या ठरवली आणि त्याची योग्य दिशेने अंमलबजावणी झाल्यास आपल्याला आगामी २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीची काय कोणाचीही गरज नाही.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Wednesday, September 25, 2013, 17:47