अनधिकृत बांधकाम पाडण्याचं वेळापत्रक देण्याचे आदेश time table illegal construction - court

अनधिकृत बांधकाम पाडण्याचं वेळापत्रक देण्याचे आदेश

अनधिकृत बांधकाम पाडण्याचं वेळापत्रक देण्याचे आदेश
www.24taas.com, झी मीडिया, पुणे

अनधिकृत बांधकामांचा मुद्दा पिंपरीत पुन्हा एकदा उफाळलाय.

अनधिकृत बांधकामांवर हातोडा कधी पडणार याचं वेळापत्रक जाहीर करण्याचे आदेश पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचं धाबं दणाणलंय.

अनेकवेळा आपापल्या बालेकिल्ल्यातच धारातिर्थी पडण्याची नामुष्की अनेकवेळा अनेकांवर येते. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची अशी अवस्था मावळमध्ये झालीय.

आझम पानसरे यांची राष्ट्रवादीला सोडचिठ्टी, लक्ष्मण जगताप यांनी उमेदवारी नाकारत शेकाप आणि मनसेला दिलेला पाठींबा, राहुल नार्वेकरांना मिळालेली मावळची उमेदवारी अशा बहुचर्चित घटनांची साखळी मावळमध्ये सुरू आहे. त्यातच आता राष्ट्रवादीच्या अडचणीत अजून भर पडलीय.

अनधिकृत बांधाकामांवर कधी हातोडा पडणार त्याचं वेळापत्रकच जाहीर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने पिंपरी चिंचवड महापालिकेला दिलेत.

श्रीकर परदेशी यांना याच मुद्द्यावर बदललं गेल्याची पूर्ण कल्पना आय़ुक्त राजीव जाधव यांना असल्याने त्यांनी सावध भूमिका घेतलीय.

आयुक्त सावध भूमिका घेत असले तरी मावळ आणि शिरूरमध्ये हा राष्ट्रवादी काँग्रेससाठी अडचणीचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे पक्षाचा कोणीही मोठा नेता यावर बोलायला तयार नाही.

या मुद्द्यावर बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादीची नाकेबंदी झालीय हे मात्र नक्की.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, March 20, 2014, 22:19


comments powered by Disqus