अनधिकृत बांधकाम पाडण्याचं वेळापत्रक देण्याचे आदेश

Last Updated: Thursday, March 20, 2014, 23:28

अनधिकृत बांधकामांचा मुद्दा पिंपरीत पुन्हा एकदा उफाळलाय. अनधिकृत बांधकामांवर हातोडा कधी पडणार याचं वेळापत्रक जाहीर करण्याचे आदेश पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत.

लोकलचे डबे घसरल्याने वाहतुकीत झालेले बदल

Last Updated: Thursday, March 20, 2014, 19:45

सीएसटीकडे जाणाऱ्या लोकलचे ५ डबे टिटवाळा ते आंबिवली दरम्यान निसटले, आणि कल्याण- कसारा, कसारा-मुंबई लोकलसेवा ठप्प झाली

कोकण रेल्वेचे मान्सून वेळापत्रक

Last Updated: Thursday, June 6, 2013, 08:28

कोकण रेल्वेने मान्सूनसाठीचे नवे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार काही गाडयांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. हे नवे वेळापत्रक १० जून ते ३१ ऑक्टोबरसाठी लागू असेल.

बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल

Last Updated: Thursday, January 17, 2013, 17:58

21 फेब्रुवारी ते 27 मार्च या काळात बारावीची परीक्षा होणार आहे. बारावीच्या विज्ञान शाखेच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

दहावी, बारावीचे परीक्षेचे वेळापत्रक

Last Updated: Monday, July 2, 2012, 21:27

बारावी आणि दहावीत गेलेल्या विद्यार्थ्यांच्या पुढच्या वर्षी होणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च २०१३ तर दहावीची परीक्षा दोन मार्च ते २५ मार्च २०१३ या कालावधीत होणार आहे.

आयपीएलचे उर्वरित सामने

Last Updated: Thursday, May 17, 2012, 23:50

प. रेल्वेचा वाढला वेग, फेऱ्याही वाढणार का?

Last Updated: Thursday, March 8, 2012, 08:35

पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गाचे डीसी ते एसी असे विद्युत परिवर्तन पुर्ण झाल्याने आता लोकल वाढवण्याची मागणी रेल्वे प्रवासी संघटना करत आहेत. एसी विद्युत प्रणालीमुळे लोकल गाड्यांचा वेग वाढवणे शक्य होणार आहे. तेव्हा गर्दीच्या वेळी दोन लोकल गाड्यांमधील वेळ ही तीन मिनीटांपेक्षा कमी करणे शक्य होणार आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबईतील उपनगरीय रेल्वे मार्गावर चर्चगेट ते अंधेरी असा डीसी ते एसी विद्यूत परिवर्तनाचा शेवटचा टप्पा नुकताच झाला. यामुळे या संपूर्ण उपनगरीय रेल्वे मार्गाचे एसीमध्ये विद्युत परिवर्तन पूर्ण झाले. या परिवर्तनामुळे लोकल गाड्यांचा वेग वाढवण्यास मदत होणार आहे. यामुळे जास्त अंतराच्या दोन रेल्वे स्थानकांमध्ये तर लोकल , १०० किलोमीटर प्रति तास एवढ्या वेगाने धावू शकते. तेव्हा पश्चिम रेल्वे मार्गावरच्या उपनगरीय वेळापत्रकामध्ये बदल करण्याची मागणी रेल्वे प्रवासी संघटनेनं केली आहे. लोकलचा वेग वाढवल्यास जास्त गाड्या सुरु करणे शक्य असल्याचं संघटनेचं म्हणणं आहे. जीवघेणी गर्दी अशी पश्चिम रेल्वेच्या या उपनगरीय मार्गाची ओळख आहे. एकुण १२१४ लोकलच्या फेऱ्या तब्बल ३० लाख प्रवाशांची दररोज वाहतूक करतात. तेव्हा लोकलचा वेग वाढल्यास तीन मिनीटांचा कालावधी कमी करता येणे शक्य होणार आहे.

दहावी, बारावी परीक्षेचे टाईमटेबल जाहीर

Last Updated: Tuesday, February 7, 2012, 13:02

महाराष्ट्र राज्यात घेण्यात येणाऱ्या १० आणि १२ वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार दहावीची परीक्षा एक मार्चला तर बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून होणार आहे.