कोल्हापुरानं केलं राज्याला जागं... पण, हिंसा असमर्थनीय!, toll agitation in kolhapur

कोल्हापुरानं केलं राज्याला जागं... पण, हिंसा असमर्थनीय!

कोल्हापुरानं केलं राज्याला जागं... पण, हिंसा असमर्थनीय!
www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूर

कोल्हापूर महानगरपालिकेच्या टोल विरोधातल्या विशेष सभेचा प्रस्ताव राज्य सरकारला प्राप्त झालाय. आता हा एका जिल्ह्याचा प्रश्न नाही, तर राज्यात टोल विरोधात आंदोलनाची एक लाट आलीय. त्यामुळे टोल संदर्भात उद्याच्या कॅबिनेट बैठकीत चर्चा केली जाईल. आणि कॅबिनेटमध्ये राज्याचं धोरण जाहीर केलं जाणार आहे.

दरम्यान, कोल्हापूरात `आयआरबी`च्या कर्मचाऱ्यांना कोल्हापूर महानगरपालिकेच्या नगरसेवक आणि टोल विरोधी कृती समितीच्या सदस्यांना हुसकावून लावलंय.

कोल्हापूरातील उचगाव इथं `आयआरबी`चे कर्मचारी राहात असल्याची माहिती टोल विरोधी कृती समितीच्या सदस्यांसह कोल्हापूर महानगरपालिकेच्या नगरसेवकांना मिळाली होती. त्यानुसार हे सगळे रात्री उशीरा उचगाव इथं पोहचले, त्यानी `आयआरबी` कर्मचाऱ्यांना कोल्हापुरी हिसका दाखवत हुसकावून लावलं. यावेळी अनेक कर्मचाऱ्यांनी लपून बसण्याचा  प्रयत्न केला, त्यावेळी नगरसेवकांनी त्यांना शोधून काढून चोप दिला आणि त्यानंतर कोल्हापूर सोडून जाण्यास भाग पाडलं.

उचगाव इथून कर्मचाऱ्यांना हुसकावल्यानंतर नगरसेवकांचा ताफा कोल्हापूर शहरातील अन्य टोल नाक्यावर आला. त्यावेळी वेगवेगळ्या टोल नाक्यावर `आयआरबी`चे कर्मचारी आहेत का हे पाहिलं आणि ज्या ठिकाणी `आयआरबी`चे कर्मचारी होते त्यांना कोल्हापूर सोडून जाण्यास भाग पाडलं.

पण, राज्यभरात टोलविरोधी आंदोनात होणाऱ्या हिंसेचा जागृत नागरिकांनी कडाडून विरोध केलाय. ही हिंसा केवळ असमर्थनीय असल्याचं त्यांनी म्हटलंय.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, January 28, 2014, 11:19


comments powered by Disqus