`टोल`ला `झेंडा` दाखवून मनसे कार्यकर्ते सभेला toll zenada and mns

`टोल`ला `झेंडा` दाखवून मनसे कार्यकर्ते सभेला

`टोल`ला `झेंडा` दाखवून मनसे कार्यकर्ते सभेला

www.24taas.com,दिनेश दुखंडे, झी मीडिया, पुणे

पुण्यात थोड्याच वेळात एसपी कॉलेजच्या मैदानात राज ठाकरेंच्या सभेला सुरूवात होणार आहे. या सभेला कार्यकर्ते वाहनांवर बाहेरून आली आहेत.

टोल न भरताच ही वाहन दाखल होत असल्याचं सांगण्यात येत आहे. टोल देण्यावरून टोल नाक्यांवर कार्यकर्ते काही ठिकाणी हातघाईवर आले होते.

वाहनांना मनसेचा झेंडा लावून कार्यकर्ते पुण्यात दाखल झाले आहेत. झेंडा आणि कार्यकर्त्यांची गर्दी पाहून टोल नाक्यावरील मुलांना, टोल मागावा की नाही हा प्रश्न सतावतोय.

काही ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करून कार्यकर्त्यांनी पुढचा रस्ता गाठला आहे. टोल न भरताच सभेला दाखल होणार असल्याचं यापूर्वीचं मनसे कार्यकर्त्यांनी ठरवलं होतं.

राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे या देखिल टोल न भरताच, मुंबईहून पुण्याकडे रवाना झाल्या आहेत.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, February 9, 2014, 17:47


comments powered by Disqus