Last Updated: Tuesday, January 21, 2014, 20:38
www.24taas.com, झी मीडिया, पुणेडॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मनीष नागोरी विकास खंडेलवाल यांनी खळबळजनक आरोप केले आहेत.
गुन्हा कबूल करण्यासाठी एटीएसचे प्रमुख राकेश मारियांनी २५ लाख रुपयांची ऑफर दिल्याचा आरोप या दोघांनी कोर्टात केलाय. नागोरी आणि खंडेलवालने दाभोलकरांच्या हत्येचे आरोप फेटाळले आहेत.
एटीएसनं ४२ दिवस चौकशी केली असून थर्ड डिग्री वापरल्याचा आरोप केलाय. एटीएसनं आपली नार्को टेस्ट घेतल्याचा आरोप नागोरीनं केलाय. दरम्यान मनीष नागोरी आणि विकास खंडेलवालला 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय...
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, January 21, 2014, 20:34