Last Updated: Wednesday, April 10, 2013, 07:49
www.24taas.com, पुणेएकीकडे अजित पवार यांच्या बेताल वक्तव्यावरून राज्यातलं वातावरण ढवळून निघालेलं असताना त्यांच्याच बालेकिल्ल्यात त्यांचे खास सहकारी येणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि अजित दादांचे विरोधक उदयनराजे भोसले पिंपरीत येत आहेत.
‘ब्रह्मा विष्णू महेश कबड्डी संघा’च्या वतीने कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. या स्पर्धेच्या उद्घाटनाला उदयनराजे भोसले येणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार असलेल्या उदयनराजेंनी अजित दादांना संधी मिळेल त्या ठिकाणी घरचा आहेर दिला आहे. त्यात सध्या इंदापुरच्या सभेत केलेल्या वक्तव्यामुळे दादांवर सध्या चहुबाजूने टीकेचा भडिमार होत आहे. त्यामुळे आजित दादांच्या बालेकिल्ल्यात येऊन आता उदयनराजे दादांच्या बाबतीत काय बोलतात याकडे सगळ्यांच लक्ष लागलंय.
अजित दादांच्या वक्तव्याने आणि त्यावर शरद पवारांच्या माफी मागण्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील कार्यकर्तेही नाराज आहेत. त्यात उदयनराजे यांच्या आगमनामुळे पिंपरीत काय घडेल, याचीच उत्सुकता आहे.
First Published: Tuesday, April 9, 2013, 19:24