उदयनराजेंचं शरद पवारांना आव्हान! udayanraje challenges Sharad Pawar!

उदयनराजेंचं शरद पवारांना आव्हान!

उदयनराजेंचं शरद पवारांना आव्हान!
www.24taas.com, झी मीडिया, सातारा


सातारा जिल्ह्यातील पाणीप्रश्नांवर खासदार उदयनराजे आक्रमक झाले असून त्यांनी थेट आपल्याच पक्षाचे प्रमुख शरद पवारांना आव्हान देण्याची भाषा सुरु केली आहे.

"माढा लोकसभा मतदारसंघ शरद पवारांचा असला तरी सातारा जिल्हा माझा आहे, त्यामुळं औंधसह १६ गावांचा पाणीप्रश्न आपणच सोडवणार" असं उदयनराजेंनी म्हटलं आहे. गेल्या आठवड्यात उदयनराजेंनी विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. त्यानंतर त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळं राजकीय अभ्यासकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील वरीष्ठ नेत्यांना उदयन राजे यांनी वेळोवेळी घरचा आहेर दिला आहे. आता पुन्हा आपल्या वक्तव्यामुळे शरद पवार यांना उदयनराजेंनी आव्हान दिलं आहे. दरम्यान, शरद पवार यांना काल ठाण्यातील भिवंडी येथे विरोधकांनी काळे झेंडे दाखवले होते.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, May 20, 2013, 16:38


comments powered by Disqus