पुन्हा एकदा उदयनराजे शरद पवारांविरोधात आक्रमक! udayanraje challenges Sharad Pawar!

पुन्हा एकदा उदयनराजे शरद पवारांविरोधात आक्रमक!

पुन्हा एकदा उदयनराजे शरद पवारांविरोधात आक्रमक!
www.24taas.com, झी मीडिया, सातारा

साता-याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पुन्हा एकदा बिनधास्त वक्तव्यानं राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला आव्हान दिलंय. सिंचनाच्या कथित भ्रष्टाचारावर बोलताना, राज्यातल्या दुष्काळाला कोण जबाबदार आहे हे सर्वाना माहित आहे अशा लोकांना जनता रस्त्यावर फिरु कशी देते, असं वक्तव्य उदयनराजेंनी केलंय.

उदयनराजे आज पुण्यात आले होते. पुण्यातल्या येरवडा परिसरातल्या गोल्फ क्लब मैदानावर होणा-या पाण्याच्या नासाडी विरुद्ध आंदोलन करणा-या राजे प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना ते भेटले तसंच गोल्फ क्लबची पाहणी केली. येरवडा परिसरातल्या मैदानासाठी आरक्षित भूखडांची आरखणं रद्द होत असल्याबद्दलही त्यांनी टीका केली.

कालही सातारा जिल्ह्यातील पाणीप्रश्नांवर खासदार उदयनराजे आक्रमक झाले होते. यावेळी त्यांनी थेट आपल्याच पक्षाचे प्रमुख शरद पवारांना आव्हान देण्याची भाषा सुरु केली आहे. माढा लोकसभा मतदारसंघ शरद पवारांचा असला तरी सातारा जिल्हा माझा आहे, त्यामुळं औंधसह १६ गावांचा पाणीप्रश्न आपणच सोडवणार असं त्यांनी म्हटलं होतं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, May 21, 2013, 20:59


comments powered by Disqus