Last Updated: Wednesday, January 16, 2013, 14:30
www.24taas.com, पटनाराज ठाकरे यांनी कालच्या पत्रकार परिषदेत सीमेवरील सैनिकांचा मुद्दा उचलून धरला होता. सैनिकांचा वापर भारत-पाकमधल्या राजकारणासाठी केला जात असल्याचा आरोप करत राज यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना बिहारचे भाजप नेते गिरीराज सिंग यांनी राज यांच्यावर स्तुतिसुमनं उधळली आहेत.
राज यांनी प्रथमच देशाच्या प्रश्नांवर भाष्य केल्याचं सांगत त्यांनी राज यांची प्रशंसा केली आहे. एखाद्या बिहारी नेत्यानं राज यांची स्तुती करण्याची ही पहिलीच वेळ आहे... त्यामुळे आता राज ठाकरे यांनी देशाबाबत वक्तव्य केल्याने त्यांच्याबाबत देशभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत.
जे जवान शहीद होत आहेत, त्यांच्यासाठी भविष्यात काय सरकार करते, सीमेवरील जवानांचा खेळ चाललाय. दोन दिवस सहानभुती दाखवायची, हेच सरकारचे धोरण आहे.` यापुढे काही घडले तर पाकिस्तानला उत्तर देऊ असे सांगणारे सिंग आधी घडलंय त्याकडे बघा, असं म्हणतं राज ठाकरे यांनी सरकारवर टीका केली आहे. तसेच लष्करप्रमुख विक्रम सिंग यांच्यावर राज ठाकरे यांनी तोंडसुख घेतले आहे.
First Published: Wednesday, January 16, 2013, 14:06