मराठा आरक्षणाला माझा विरोध नाही - राज ठाकरे, i have no oppose to maratha aarakshan say`s Raj Thackeray

मराठा आरक्षणाला माझा विरोध नाही - राज ठाकरे

मराठा आरक्षणाला माझा विरोध नाही - राज ठाकरे
www.24taas.com, झी मीडिया, पंढरपूर

दुष्काळ पडतोच कसा असा सवाल उपस्थित करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर तोंडसुख घेतलंय... दुष्काळ पाहणीसाठी राज पंढरपुरात आले होते... दुष्काळालाही सरकार जबाबदार असल्याचा आरोप राज यांनी केलाय.. तसंच मराठा आरक्षणाबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीय..

मराठा आरक्षणाला विरोध नसल्याचं राज यांनी स्पष्ट केलंय.. राज्यकर्त्यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नसून केवळ राजकारण करायचं असल्याचा आरोप राज यांनी केला.. राज ठाकरे कालपासून चारा छावणी दौरा करीत आहेत. ५ मेपर्यंत ते विविध चारा छावण्यांना भेटी देणार आहेत.


सांगलीतल्या जतमध्ये जाऊन राज ठाकरे चारा छावण्यांची पाहणी करणार आहेत. सातारा, सांगलीबरोबरच सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यातील चारा छावण्यांना ते भेट देणार आहेत.

First Published: Friday, May 3, 2013, 12:09


comments powered by Disqus