राज ठाकरे यांचा आजपासून चारा छावणी दौरा, Raj Thackeray Maharashtra tour for Drought

राज ठाकरे यांचा आजपासून चारा छावणी दौरा

राज ठाकरे यांचा आजपासून चारा छावणी दौरा
www.24taas.com, झी मीडिया, सातारा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून चारा छावणी दौरा सुरू करत आहेत. ५ मेपर्यंत ते विविध चारा छावण्यांना भेटी देणार आहेत.

आज सातारा जिल्ह्यातल्या गोंदवले इथं, तर सांगलीतल्या जतमध्ये जाऊन राज ठाकरे चारा छावण्यांची पाहणी करणार आहेत. सातारा, सांगलीबरोबरच सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यातील चारा छावण्यांना ते भेट देणार आहेत.

राज ठाकरे यांनी काही दिवसापूर्वीच महाराष्ट्र दौरा केला होता. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरें यांनी महाराष्ट्र पिंजून काढला होता. मात्र आता पुन्हा एकदा दुष्काळी परिस्थिती पाहता चारा छावण्याची काय अवस्था आहे. हे पाहण्यासाठी राज ठाकरे महाराष्ट्रातील दुष्काळी भागाचा दौरा करणार आहेत.

First Published: Thursday, May 2, 2013, 11:34


comments powered by Disqus