Last Updated: Wednesday, March 6, 2013, 11:14
www.24taas.com, नाशिकराज ठाकरे यांची भाषणं म्हणजं संध्याकाळची एन्टरटेनमेंट आहे, अशा शब्दांत ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी तोफ डागली आहे. बघणाऱ्यांनाही संध्यकाळी हेच हवं असतं, असं सांगत राज यांच्या सभांना होणाऱ्या गर्दीचीही त्यांनी खिल्ली उडवली.
सत्ताधाऱ्यांच्या चूका दाखवून पर्याय सुचवायचं सोडून मोठ्या पक्षांवर टीका करायची आणि दमून भागून आलेल्या लोकांचं मनोरंजन करायचं, अशी प्रथा सुरू झाली आहे. मात्र कुसुमाग्रजांच्या नाशिकमध्ये सुसंस्कृत लोक राहतात...
असंस्कृत आणि टोकाची टीका करणाऱ्यांकडे ते दुर्लक्ष करतात, असंही पाटील यांचं म्हणणं आहे. मनसेचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकमध्ये जाऊन पाटील यांनी ही टीका केल्यानं राष्ट्रवादी-मनसेमधल्या वादाला नवं तोंड फुटलं आहे....
First Published: Wednesday, March 6, 2013, 10:54