तरुणीच्या विनयभंगानंतर मनसे नेता फरार, MNS leader booked for molesting girl

तरुणीच्या विनयभंगानंतर मनसे नेता फरार

तरुणीच्या विनयभंगानंतर मनसे नेता फरार

www.24taas.com, झी मीडिया, कल्याण

टिटवाळ्यात एका तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका मनसे पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

उत्तम सुरोसी हा कांबा गावातील मनसे शाखेचा अध्यक्ष आहे... उल्हासनगरला राहणारी २१ वर्षींची तरुणी गुरुवारी आपल्या मित्रासोबत कांबा गावातील धाब्यावर जेवायला गेली होती. यावेळी, काही कारणावरून उत्तम सुरोसी यानं आपल्याबरोबर गैरवर्तवणूक केल्याची तक्रार या मुलीनं पोलिसांत दाखल केलीय.

टिटवाळा पोलिसांनी त्वरीत कारवाई करत सुरोसी याच्यावर ३५४ (विनयभंग), ३२३ (दुखापतीचा प्रयत्न) आणि ५०४ (धमकी देणं) अशा गुन्ह्यांची नोंद केलीय.

उत्तम सुरोसी हा या प्रकारानंतर गायब आहे. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केलाय. सुरोसी याला अटक होण्याची शक्यताही वर्तविली जातेय. आता राज ठाकरे काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, March 15, 2014, 09:24


comments powered by Disqus