Last Updated: Friday, January 11, 2013, 09:41
www.24taas.com, मुंबईमनसेच्या एसटी कर्मचारी संघटनेच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी मोर्चा काढणारच अशी भूमिका मनसेनं घेतली आहे. मात्र दुसरीकडे मोर्चाबाबत तोडगा काढण्यासाठी पोलिसांशी बोलणी सुरू असल्याचं मनसे राज्य परिवहन वाहतूक संघटनेचे अध्यक्ष अविनाश अभ्यंकर यांनी सांगितलं आहे.
मुंबईतल्या आझाद मैदानात आयोजित केलेला मनसे एसटी कामगार सेनेचा मोर्चा अडचणीत आला आहे. या मोर्चाला पोलिसांची परवानगी नसल्यानं मोर्चामध्ये सहभागी होणाऱ्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होऊ शकते. राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक म्हणजेच मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकाऱ्यांनी राज्य परिवहनच्या सर्व विभाग नियंत्रकांना याप्रकरणी आदेश दिले आहेत.
त्यामुळं सहभागी कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. मनसेनं कर्मचाऱ्यांच्या सोयीसुविधांसाठी अनेक मागण्या केल्या असून या मागण्यांवर ठाम असल्याचंही अभ्यंकरांनी सांगितलं आहे. संघटनेचे सदस्य असलेल्या राज्यातल्या हजारो एसटी कर्मचाऱ्यांनी सामूहिक रजा टाकून आंदोलन सुरू केलं आहे.
First Published: Friday, January 11, 2013, 09:33