रोज फटकावता येईल ऐवढे मटेरिअल माझ्याकडे – राज, RAJ THACKERAY LASHESH OUT OPPOSITION

रोज फटकावता येईल एवढं मटेरिअल माझ्याकडे – राज

रोज फटकावता येईल एवढं मटेरिअल माझ्याकडे – राज
www.24taas.com, मुंबई
येत्या फेब्रवारीपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात १० सभा घेणार असून त्यासाठी भरपूर मटेरिअल माझ्याकडे आहे. आपल्या देशात मटेरिअलची कमतरता नसते. दररोज कोणाला तरी फटकावता येईल असे मटेरिअल कायम तयार असते, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे व्यक्त केले.

प्रवीण दरेकरांच्या मतदारसंघातील विकास कामांच्या उदघाटन सोहळा राज ठाकरेंच्या उपस्थितीत कांदिवलीमध्ये झाला. त्यावेळी ते बोलत होते. आपल्या २ ते ३ मिनिटांच्या भाषणात त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी ते म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून बोललो नाही. काही दिवसांपूर्वी थोडीशी झलक दाखवली होती. आता फेब्रवारीपासून माझा महाराष्ट्राचा दौरा होणार आहे. या दौऱ्याची पहिली सभा कोल्हापूरमध्ये होणार आहे. यावेळी, अनेकांचा समाचार घेणार असल्याचा संकेत त्यांनी यावेळी दिले.

महाराष्ट्राच्या दौऱ्यात किमान १० सभा घेणार आहे. त्यासाठी माझ्याकडे भरपूर मटेरिअल आहे. आपल्या देशात मटेरिअलची कमतरता नसते. दररोज कोणाला तरी फटकवता येईल, एवढे मटेरिअल आपल्याकडे दररोज तयार होते. त्यामुळे या दौऱ्यात फटकेबाजी तुम्हांला पाहायला मिळणार असल्याचेही संकेत त्यांनी यावेळी दिले.

या दौऱ्यामध्ये मी मत मागायला जाणार नाही, तर माझं मत मांडायला जाणार असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

First Published: Monday, January 14, 2013, 21:16


comments powered by Disqus