Last Updated: Tuesday, January 15, 2013, 14:18
www.24taas.com, मुंबईमनसे अध्यक्ष राज ठाकरे आज हे आज संध्याकाळी पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळे त्यांची तोफ पुन्हा एकदा धडाडणार आहे. गेले अनेक दिवस राज ठाकरे यांनी मौन बाळगले होते. मात्र आज ते पत्रकार परिषदेत अनेक गोष्टींचा समाचार घेणार आहेत. त्यामुळे राज ठाकरे कोणावर टीकेची झोड उठवणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
येत्या फेब्रवारीपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर राज ठाकरे जाणार आहेत. या दौऱ्यात १० सभा घेणार असून त्यासाठी भरपूर मटेरिअल माझ्याकडे आहे. आपल्या देशात मटेरिअलची कमतरता नसते. दररोज कोणाला तरी फटकावता येईल असे मटेरिअल कायम तयार असते, असे मत कालच राज ठाकरेंनी व्यक्त केले होते.
`गेल्या काही दिवसांपासून बोललो नाही. काही दिवसांपूर्वी थोडीशी झलक दाखवली होती`. आता फेब्रवारीपासून माझा महाराष्ट्राचा दौरा होणार आहे. या दौऱ्याची पहिली सभा कोल्हापूरमध्ये होणार आहे. यावेळी, अनेकांचा समाचार घेणार असल्याचा संकेत त्यांनी दिले होते.
First Published: Tuesday, January 15, 2013, 14:04