राज कडाडले, खडसेंवर केले पुन्हा एकदा आरोप..., Raj Thackeray on eknath khadse in jalgaon

राज कडाडले, खडसेंवर केले पुन्हा एकदा आरोप...

राज कडाडले, खडसेंवर केले पुन्हा एकदा आरोप...
www.24taas.com, जळगाव

राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा खडसेंवर टीका केली. विरोधी पक्ष नुसता चहापानापुरता का? असा सवाल त्यांनी केला आहे. खडसे सेटलमेंट करतात असाही आरोप राज ठाकरेंनी केला.

विरोधी पक्ष नुसता चहापानापुरता असतो का? असं असेल तर आम्ही आमचं पाहून घेऊ असं म्हणत राज ठाकरेंनी खडसेंना पुन्हा एकदा टार्गेट केलं. टोलनाक्यांचा विषय विधानसभेत का आला नाही? मी स्वत: त्यांचाशी बोललो होतो.


तरी त्यांनी विषय विधानसभेत मांडलाच नाही. राज ठाकरेंनी जळगावमध्ये जाऊन थेट खडसेंवर हल्लाबोल केला. खडसे सेटलमेन्ट करतात असा आरोप करीत राज ठाकरेंनी सभेपूर्वीच वादळं निर्माण केलं. त्याचबरोबर राज ठाकरेंनी त्यांची नक्कलही केली. त्यामुळे आता खडसे आता काय उत्तर देणार आणि उद्या राज ठाकरे सभेत आणखी कोणा-कोणाचा समाचार घेणार याकडेच सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

First Published: Saturday, April 6, 2013, 23:28


comments powered by Disqus