राहुल गांधीचा अभ्यास आहे का? - राज ठाकरे, Raj Thackeray on Rahul Gandhi

राहुल गांधीचा अभ्यास आहे का? - राज ठाकरे

राहुल गांधीचा अभ्यास आहे का? - राज ठाकरे
www.24taas.com, मुंबई

राहुल गांधीचा अभ्यास नाही. काही तरी बोलावं म्हणून ते बोलत असतात, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी राहुलना टोला लगावलाय. एक व्यक्ती देश चालवू शकत नाही, असं राहुल दोन दिवसांपूर्वी बोलले होते. यावर राज यांनी इंदिरा गांधींची आठवण करून दिली. त्यांनी एकटीच्या बळावर देश चालवून दाखवला होता, असं राज ठाकरे म्हणाले.

आपल्या सभांना होत असलेली गर्दी म्हणजे बदलाचे वारे असाल्याच राज म्हणाले. ठाण्याच्या दुर्घटनेवर जळगावच्या सभेत बोलेन, असंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे उद्याच्या सभेत राज्कार्त्यांच्या डोळ्यात अंजन घालणार असल्याचे सुतोवाच राज यांनी दिले आहेत. राज्यात आपली एक हाती सत्ता आल्यावर बदल होतील असे राज ठाकरे यांनी धुळ्यात पत्रकारांशी संवाद साधताना स्पष्ट केले.

सुधारणांना वाव देणारं नेतृत्व समोर यायला हवे खुच्या उबवणारे आणि सत्तेचा वापर करणाऱ्यांच्या पाठीशी मनसे कधीच उभी राहणार नाही असे स्पष्ट शब्दात राज ठाकरे यांनी आपलं मत मांडलं.

First Published: Saturday, April 6, 2013, 21:05


comments powered by Disqus