राज ठाकरें विचारतात, कुठे गेला राम?, Raj Thackeray on Ram Kadam

राज ठाकरें विचारतात, कुठे गेला राम?

राज ठाकरें विचारतात, कुठे गेला राम?
www.24taas.com, मुंबई

मनसेच्या सातव्या वर्धापनदिनी मनसेचे मुंबईतील सगळे आमदार आणि प्रमुख पदाधिकारी आज षण्मुखानंद सभागृहात उपस्थित असताना घाटकोपरचे आमदार राम कदम यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय बनली. कदम यांच्या अनुपस्थितीची दखल खुद्द पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही घेतली.

राज ठाकरे तसंच वरिष्ठ नेत्यांना कुठलीही कल्पना न देता कदम या कार्यक्रमाला आले नाहीत त्यामुळे राम कदम नेमके आहेत कुठे असा प्रश्न समोर आला आहे. कदमांच्या अनुपस्थितीबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जात असले तरी कदम हे सोमवारी उपलब्ध होतील असा दावा मनसेचे विधिमंडळ गटनेते बाळा नांदगावकर यांनी `झी २४ तास`शी खास बोलताना केला.


मात्र आमदार राम कदम यांनी अनुपस्थित का राहत आहोत हे किमान पक्ष अध्यक्ष राज ठाकरेंना कळविणे गरजेचे होते. असेही बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केलं.

First Published: Saturday, March 9, 2013, 23:10


comments powered by Disqus